Wednesday, March 22, 2017

का? 😢

का कुणी आपलेसे करावे
का हे मन गुंतून जावे
कधी न हरवणारे
त्यांच्या आठवणीत भान हरवून जावे

का इतक्या आठवणी द्याव्या
का द्यावे डोळ्यातले पाणी
का इतकी आस लावावी
निघुन गेल्यावर
कंठ दाटुनि येई

ख़रच कळाले आता
आयुष्य आहे क्षणभंगुर
जगुन घ्यावे आहे तितके
एक दिवस जावे लागते
खुप खुप दुर!

आठवणी अनेक
अनेक किस्से
तुम्ही आठवताक्षणी
आता हसावे
की रडावे

'दादा' तुम्ही सदैव रहाल
आमच्या मनात
आमच्या आठवणीत
तुमच्याच स्मृतिप्रीत्यर्थ माझ्याकारिता
चमकेल सदैव आता ध्रुव तारा लखलखित 😞